500 Rupees Note Band Hoil Ka Printing Cost : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी केंद्र सरकारकडे मोठ्या किंमतीच्या नोटा – विशेषतः ₹500 च्या नोटा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांचा दावा आहे की, मोठ्या नोटांमुळे भ्रष्टाचार आणि काळा पैसा वाढतो, तर डिजिटल व्यवहार सहज ट्रॅक करता येतात. याशिवाय, अशा नोटा छापण्यावर सरकारचा खर्चही खूप जास्त येतो.
या चर्चेमुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की भारतात नाणे व नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो? RTI च्या आधारे असे समोर आले आहे की ₹1 चे नाणे तयार करण्यासाठी ₹1.11 खर्च येतो, म्हणजे उत्पादन खर्च वास्तविक मूल्याहूनही जास्त आहे.
नाण्यांची छपाई: येणारा खर्च
₹2 चे नाणे: ₹1.28 खर्च
₹5 चे नाणे: ₹3.69 खर्च
₹10 चे नाणे: ₹5.54 खर्च
ही नाणी मुख्यतः मुंबई आणि हैदराबादमध्ये तयार केली जातात.
नोटांची छपाई: प्रत्येक मूल्याचा नोटेचा वेगळा खर्च
नोटा छपाईचे काम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBI Note Printing Pvt Ltd या सबसिडीअरीकडून होते.
₹10 च्या 1000 नोटा: ₹960 खर्च
₹100 च्या 1000 नोटा: ₹1,770 खर्च
₹200 च्या 1000 नोटा: ₹2,370 खर्च
₹500 च्या 1000 नोटा: ₹2,290 खर्च
हे आकडे 2018 मधील RTI नुसार आहेत, त्यामुळे 2025 मध्ये यामध्ये आणखी वाढ झाली असण्याची शक्यता आहे.
500 च्या नोटा बंद करण्याचा प्रस्ताव का?
चंद्रबाबू नायडू यांच म्हणण आहे की, मोठ्या नोटांमुळे काळा पैसा साठवणे सोपे होते, त्यामुळे जर डिजिटल व्यवहारांना चालना दिली तर अधिक पारदर्शक व्यवहार होतील. त्याचबरोबर नोटा छपाईवरील खर्चातही लक्षणीय घट होईल.
सध्या हा विषय केवळ सल्ल्याच्या टप्प्यावर आहे, पण भविष्यात यावर अधिक विचार झाल्यास ₹500 च्या नोटांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा : गटई कामगारांसाठी आनंदाची बातमी! 100% अनुदानावर मिळणार स्टॉल – अर्ज प्रक्रिया सुरू.