8th Pay Commission Salary Hike Central Government Employees Expected Calculation : केंद्र सरकारच्या सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि ६८ लाख पेन्शनधारकांना उत्सुकता आहे की 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांचा पगार आणि पेन्शन किती वाढणार. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर २०२५ मध्ये संपत असल्याने, 8वा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?
सरकारने 2025 मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, तो 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येण्याची शक्यता आहे. वेतन आणि पेन्शनमध्ये होणारे बदल हाच आधार मानून नव्या शिफारशी लागू होतील.
8th Pay Commission फिटमेंट फॅक्टरमुळे किती वाढ?
मागील 7व्या वेतन आयोगात मूळ पगार ₹7,000 वरून ₹18,000 पर्यंत वाढवण्यात आला होता. यंदा फिटमेंट फॅक्टर 3 किंवा अधिक असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात सरासरी ₹19,000 पर्यंत वाढ होऊ शकते.
किमान पगार आणि पेन्शन किती?
8व्या वेतन आयोगामुळे किमान मूळ वेतन ₹51,480 इतके होईल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे, पेन्शनधारकांची किमान पेन्शन देखील ₹27,740 पर्यंत वाढू शकते.
अर्थव्यवस्थेतील महागाई आणि जीवनावश्यक खर्च वाढत असताना, सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी वेतन आयोग ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. नव्या आयोगामुळे वेतन आणि भत्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे “अच्छे दिन” येणार येतील, अशी आशा अनेक कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : आधार कार्ड अजूनही अपडेट केल नाही? मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी गमावू नका.