8th Pay Commission News: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; मूळ पगार ₹१८,००० वरून थेट ₹५१,४८० पर्यंत?

2 Min Read
8th Pay Commission Salary Hike Update

नवी दिल्ली | २४ मे २०२५: 8th Pay Commission Salary Hike Update – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ८वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू होण्याच्या शक्यता आता अधिक बळकट होत आहेत. सध्या सातवा वेतन आयोग लागू असून त्याचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. त्यामुळे नवीन वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात ८व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. त्यानंतर संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने वेतन आयोग लागू करण्याआधी समिती गठीत करणे, पगाराचा आढावा घेणे आणि शिफारसी सादर करणे यासारख्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो.

किती वाढणार पगार?

मीडिया रिपोर्टनुसार, ८व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर सध्या २.२८ वरून २.८६ पर्यंत वाढवला जाऊ शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जो सध्या ₹१८,००० आहे, तो थेट ₹५१,४८० पर्यंत वाढू शकतो. ही जवळपास १८६% ची वाढ आहे. मात्र, या वाढीबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

किती कर्मचाऱ्यांना होणार फायदा?

८व्या वेतन आयोगामुळे सुमारे १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना थेट फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या घोषणेची मोठी उत्सुकता आहे. गेल्या वेळेस ७वा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता, ज्याची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती. यंदाही तसेच स्वरूप पाहायला मिळू शकते.

जानेवारी २०२६ पासून ८वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असून, तो लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. सध्या अधिकृत GR किंवा समिती गठीत होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच महागाई भत्तावाढीचा निर्णय अपेक्षित.

Share This Article