Aadhaar Biometric Update For Kids Without Appointment : मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेटसाठी आता अपॉइंटमेंट घेण्याची गरज भासणार नाही. UIDAI ने सुरू केलेल्या नव्या मोहिमेमुळे पालक थेट मुलांना आधार सेवा केंद्रात घेऊन जाऊन त्यांचे बायोमेट्रिक अपडेट करू शकतील. ही सुविधा लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू करण्यात येणार आहे.
UIDAI ने ५ ते १५ वयोगटातील मुलांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटसाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू करणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४:३० ते ५:३० आणि शनिवार-रविवार दिवसभर अपॉइंटमेंटशिवाय सेवा दिली जाणार आहे. यामुळे हजारो पालक आणि विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुलांच्या आधारमध्ये बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य असते जेव्हा ते ५ किंवा १५ व्या वर्षीचे होतात. या प्रक्रियेत फिंगरप्रिंट, डोळ्यांची स्कॅनिंग आणि नविन फोटोग्राफ घेतले जातात. आता या अपडेटसाठी कोणतीही ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करावी लागणार नाही.
आधार केंद्रांमध्ये नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी स्वतंत्र यंत्रणा (मशिन्स) उभारण्यात येत आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.
आधार सेवा केंद्रासोबतच बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या नव्या मोहिमेमुळे नागरिकांना सहज सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 UPI वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.