Aadhaar Card: उरले फक्त 48 तास, लवकर करा तुमच आधार कार्ड अपडेट, अन्यथा भरावे लागेल शुल्क

2 Min Read
Aadhaar Card Update Deadline June 2025 Free Online

Aadhaar Card Update Deadline June 2025 Free Online : भारतीय नागरिकांनी १० वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड अद्ययावत न केल्यास १४ जून २०२५ नंतर त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. UIDAI ने नागरिकांना विनामूल्य अपडेटची अंतिम मुदत दिली असून, त्यानंतर ₹५० शुल्क आकारले जाणार आहे.

आधार अपडेट का गरजेचे आहे?

आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) २००९ पासून हे कार्ड जारी करत आहे. या कार्डावर १२ अंकी युनिक ओळख क्रमांक, बायोमेट्रिक माहिती आणि डेमोग्राफिक डिटेल्स असतात. सरकारी योजना, बँकिंग, गुंतवणूक यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी आधार आवश्यक आहे.

UIDAI च्या नियमानुसार, आधार कार्ड दर १० वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने मागील १० वर्षांत आपले आधार अपडेट केले नसेल, तर त्यांनी ते १४ जून २०२५ पूर्वी अद्ययावत करणे आवश्यक आहे.

१४ जूनपूर्वी विनामूल्य संधी

UIDAI ने नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून आधार मोफत अपडेट करण्याची सुविधा १४ जून २०२५ पर्यंत उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर हे अपडेट करण्यासाठी ₹५० शुल्क आकारले जाईल. ही डेडलाइन यापूर्वीही अनेकदा वाढवण्यात आली आहे.

अपडेट कसे करावे?

नागरिक UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले आधार अपडेट करू शकतात. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येत नाही. वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि OTPच्या सहाय्याने लॉगिन करून डॉक्युमेंट्स अपडेट करता येतात.

जर तुमच्या आधार कार्डाला १० वर्षांहून अधिक कालावधी झाला असेल आणि ते अद्ययावत नसेल, तर १४ जून २०२५ पूर्वी मोफत अपडेट करून घ्या. अन्यथा त्यानंतर शुल्क भरावे लागेल आणि सरकारी योजनांमधून अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीं यादीत होणार मोठा बदल, CBDT ने दिली परवानगी.

Share This Article