तीन दिवसांच्या आत हे महत्वाचं काम करण गरजेच, ही असणार आहे अंतिम संधी, Aadhaar Card Update Last Date

2 Min Read
Aadhaar Card Update Last Date Free Online Offline Process

Aadhaar Card Update Last Date Free Online Offline Process : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत आता जवळ आली आहे. येत्या १४ जून रोजी ही संधी समाप्त होणार असून, नागरिकांकडे पुढील केवळ तीन दिवस उरले आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत आवश्यक बदल केले नसतील, तर हे काम त्वरीत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, नंतर या सेवेकरिता शुल्क भरावे लागेल.

आधार अपडेट का महत्त्वाचे?

सध्याच्या घडीला आधार कार्ड हे प्रत्येक सरकारी व खाजगी व्यवहारामध्ये ओळखीचा आधार म्हणून वापरले जाते.
नवीन सरकारी योजना, बँक खाती, नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे अशा विविध ठिकाणी १२ अंकी आधार क्रमांक अनिवार्य आहे.
सरकारच्या नियमानुसार, प्रत्येक व्यक्तीने आपले आधार कार्ड दहा वर्षांमध्ये एकदा अपडेट करणे आवश्यक आहे.
बाल आधार सुद्धा ५ ते १५ वयाच्या दरम्यान अपडेट करणे अपेक्षित आहे.

कोणत्या नागरिकांनी त्वरित अपडेट करावे?

ज्यांनी मागील १० वर्षांपासून आधार अपडेट केले नाही, त्यांनी हे काम त्वरीत पूर्ण करणे गरजेचे आहे.
याआधी UIDAI ने काही वेळा अंतिम मुदत वाढवली होती, परंतु यावेळी मुदत वाढण्याची शक्यता कमी आहे.
१४ जूननंतर आधार अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

ऑनलाइन देखील शक्य

अनेक नागरिकांना वाटते की आधार अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात प्रत्यक्ष जावे लागते, मात्र तसे नाही.
UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर https://uidai.gov.in/ जाऊन काही बदल ऑनलाइन करता येतात.
मात्र नाव, लिंग, जन्मतारीख आणि बायोमेट्रिक माहिती बदलण्यासाठी प्रत्यक्ष आधार केंद्रात जावे लागते.

आधारच्या फोटोकॉपीची गरज नाही

अलीकडेच सरकारने आधार अ‍ॅप सुद्धा सादर केले आहे. या माध्यमातून लवकरच नागरिकांना डिजिटल स्वरूपात ओळख सिद्ध करता येणार आहे.
त्यामुळे आता हॉटेल, विमानतळ किंवा सिम कार्ड खरेदी करताना फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही.
यामुळे फोटोकॉपीच्या गैरवापराचा धोका सुद्धा टळेल.

हेही वाचा : महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा! जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणार एका क्लिकवर.

Share This Article