Aadhaar Lock Online : डिजिटल युगात तुमचा आधार क्रमांक सुरक्षित ठेवण ही एक अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. कारण सध्या अनेक स्कॅमर्स वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी आधारचा गैरवापर करून फसवणूक करत आहेत. यामुळे UIDAI ने वापरकर्त्यांना ‘आधार लॉक’ करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेकांना अजूनही या सुविधेबाबत माहिती नाही.
UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमच आधार कार्ड तात्पुरत डिजिटल स्वरूपात लॉक करू शकता. हे केल्यामुळे कोणतीही अनधिकृत सेवा किंवा व्यवहार तुमच्या आधारवर होऊ शकणार नाहीत. विशेष म्हणजे, लॉक केल्यानंतरही ‘Virtual ID’ चा वापर करून आवश्यक सेवा वापरता येतात.
आधार कार्ड लॉक करण्याची प्रक्रिया:
- UIDAI च्या वेबसाइटला (https://myaadhaar.uidai.gov.in) भेट द्या
- “My Aadhaar” विभागात जा व “Lock/Unlock Aadhaar” पर्याय निवडा
- “Lock UID” वर क्लिक करा व पुढे “Proceed to Lock Aadhaar” बटण दाबा
- तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका
- “Lock Aadhaar” वर क्लिक करा — तुमच आधार आता यशस्वीरित्या लॉक होईल
Aadhaar Un-Lock कधी आणि कस करायच?
जर तुम्हाला आधारचा वापर करायचा असेल (उदा. KYC किंवा बँक व्यवहारासाठी), तर तुम्ही त्याच वेबसाइटवर जाऊन ‘Unlock UID’ पर्याय वापरून ते तात्पुरते अनलॉक करू शकता. हे अनलॉक काही तासांसाठी वैध असते.
Virtual ID म्हणजे काय?
VID हा एक १६ अंकी तात्पुरता आधार पर्याय आहे. तो UIDAI च्या संकेतस्थळावरून सहज जनरेट करता येतो. VID चा वापर केल्यास तुमचा मूळ आधार क्रमांक सुरक्षित राहतो आणि तुम्हाला आधार संबंधित कोणतीही सेवा मिळण्यासही अडचण येत नाही.
🔴 हेही वाचा 👉 यूपीआय व्यवहारात मोठा बदल; ३० जूनपासून नवीन नियम लागू.