Aadhaar Mobile Number Update Without OTP : जर तुमच्या आधार कार्डमध्ये नोंदवलेला तुमचा जुना मोबाइल नंबर बंद झाला असेल किंवा त्या नंबर वर OTP येत नसेल, आणि त्यामुळे तुमची अनेक कामे अडकत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. UIDAI ने आता एक अशी सोपी आणि सुरक्षित पद्धत सुरू केली आहे, ज्याद्वारे OTP ची गरज न पडता आधार कार्डाशी नवीन मोबाइल नंबर लिंक करता येतो.
सरकारी योजनांची माहिती, सबसिडी, बँकिंग सेवा, पासपोर्ट अर्ज, ITR फाइलिंग किंवा e-KYC प्रक्रिया या सर्वांसाठी आधार कार्ड आणि त्याला लिंक केलेला मोबाइल नंबर अत्यंत आवश्यक आहे. पण अनेक वेळा OTP न येण्याची अडचण येते. यावर UIDAI ने ऑफलाइन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
OTP शिवाय मोबाइल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया:
नजीकच्या आधार सेवा केंद्रात जा – UIDAI च्या पोर्टलवरून जवळच केंद्र शोधा.
मुलभूत कागदपत्र घ्या – मूळ आधार कार्ड आणि नवीन मोबाइल नंबर असलेला मोबाईल घेऊन जा.
आधार अपडेट फॉर्म भरा – केंद्रावर उपलब्ध असलेला फॉर्म भरा.
बायोमेट्रिक सत्यापन – फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनद्वारे तुमची ओळख पटवली जाईल.
५० रुपये शुल्क भरा – अपडेट प्रक्रियेसाठी शुल्क भरल्यावर रिसीट मिळेल.
१ ते ३ कामकाज दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल – यानंतर तुम्ही OTP आणि इतर सेवा वापरू शकाल.
ही पद्धत ज्यांना OTP येत नाही त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि यामुळे आता तुमच कोणतही महत्त्वाच काम अडणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 EPFO News: आता PF बॅलन्स तपासण आणि पेन्शन मिळवण झाल अगदी सोप!.