UIDAI Guidelines: किती वर्षांनी आधार कार्डवरील फोटो अपडेट करणे आवश्यक आहे? जाणून घ्या नियम

2 Min Read
Aadhaar Photo Update UIDAI Guidelines

Aadhaar Photo Update UIDAI Guidelines : भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे असलेल आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाच ओळखीच दस्तऐवज आहे. याचा वापर विविध सरकारी योजनांपासून ते बँक खात, नोकऱ्या, गुंतवणूक यांसाठी ओळख पुरवणारा आधार म्हणून केला जातो. मात्र, जर आपल्या आधार कार्डवरील छायाचित्र खूप जुने झाले असेल, तर त्यात वेळोवेळी बदल करणे गरजेचे ठरते.

का बदलावा फोटो?

वयासोबत चेहऱ्यात होणारे बदल हे ओळखीस अडथळा ठरू शकतात. अनेक सरकारी प्रक्रियांमध्ये आधारवरील फोटो आणि प्रत्यक्ष चेहरा यात साम्य असणे आवश्यक असते. त्यामुळे जुना फोटो ओळखीस अडथळा ठरू शकतो.

किती वर्षांनी बदलावा फोटो?

UIDAI ने फोटो बदलण्याची कोणतीही अनिवार्य कालमर्यादा ठरवलेली नाही, मात्र UIDAI ने दहा वर्षातून एकदा तरी फोटो अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ही गोष्ट विशेषतः अशा व्यक्तींना लागू होते, ज्यांच्या चेहऱ्यात वयानुसार लक्षणीय बदल झालेले असतात.

आधार कार्डमधील फोटो कसा बदलावा?

आधार कार्डमधील फोटो अपडेट करण्यासाठीची सोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.
  2. तिथे जाऊन फोटो अपडेट करायचा असल्याचे सांगा.
  3. संबंधित फॉर्म भरून सबमिट करा.
  4. त्यानंतर तुमचा नवीन फोटो घेतला जाईल आणि बायोमेट्रिक घेतले जाईल.
  5. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फी भरावी लागेल.
  6. फोटो अपडेटची विनंती सिस्टममध्ये दाखल केली जाईल.
  7. काही दिवसांत नवीन फोटोसह आधार कार्ड अपडेट होईल.

जरी UIDAI ने फोटो बदलण्याचे बंधनकारक नियम ठरवले नसले तरी ओळख स्पष्ट राहावी यासाठी दर 10 वर्षांनी फोटो अपडेट करणे गरजेचे आहे. यामुळे सरकारी, आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांमध्ये गैरसमज, अडथळे टाळता येतील.

हेही वाचा : कधी जमा होणार पैसे? आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत?.

Share This Article