Aadhaar Update Last Date 2025 Online Process : देशातील अनेक नागरिकांना सध्या एकच प्रश्न सतावत आहे – “माझ आधार कार्ड अजूनही मोफत अपडेट करता येऊ शकत का?” या प्रश्नाच उत्तर आहे ‘हो’ अजूनही तुम्ही आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता, त्यासाठी देण्यात आलेली अंतिम तारीख आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ज्यांनी अद्याप आधार अपडेट केलेल नाही त्यांच्यासाठी आधार मोफत अपडेटची ही शेवटची संधी आहे, ही संधी पुन्हा मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
२०१०-२०१२ दरम्यान अनेक नागरिकांचे आधार कार्ड तयार झाले होते. आता जवळपास दशकभर उलटून गेल्याने आधार कार्डवरील माहिती किंवा दस्तऐवज कालबाह्य झाल्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने देशभरातील नागरिकांना १० वर्षांपूर्वीचे आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी मुदत दिली होती. ही अंतिम तारीख आहे १४ जून २०२५. म्हणजेच, हे काम करण्यासाठी नागरिकांकडे आता फारसा वेळ उरलेला नाही.
आधार कार्ड हे आज जवळपास प्रत्येक सरकारी आणि खाजगी व्यवहारासाठी अत्यावश्यक झाले आहे. बँक खाते उघडायच असो, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असो, नवीन सिम कार्ड घ्यायच असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायच असो – आधार कार्ड शिवाय हे शक्य होत नाही. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे केवळ कागदोपत्री काम नाही, तर भविष्यातील अडचणी टाळण्यासाठीही खूप महत्त्वाच आहे.
सुदैवाने, UIDAI कडून ही सुविधा घरबसल्या ऑनलाईन दिली गेली आहे. नागरिक uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल आधार कार्ड अपडेट करू शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी असून, ओटीपी लॉगिनद्वारे दोन मुख्य दस्तऐवज – ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा – अपलोड करून अपडेट करता येतात. यासाठी मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या वैध दस्तऐवजांचा वापर करता येतो. अपडेट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाल्याची खात्री देणारा एक रिक्वेस्ट नंबर दिला जातो, ज्याच्या मदतीने पुढे तुम्हाला अपडेटची स्थिती तपासता येते.
विशेष म्हणजे, १४ जूनपर्यंत या सेवेचा लाभ पूर्णतः मोफत आहे. मात्र एकदा का ही मुदत संपली, की त्यानंतर कदाचित ही सेवा शुल्कासह असेल. त्यामुळे ज्यांनी आजवर आधार अपडेट केलेल नाही, त्यांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
तुमच किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाचही आधार १० वर्षांपूर्वीच असल्यास, ही मोफत अपडेटची अंतिम संधी असल्याने आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करण गरजेच आहे.
हेही वाचा : दर महिन्याला फक्त 5,000 रुपये गुंतवून मिळवा ₹8,54,272.