मुंबई | २६ मे २०२५ : Ajit Pawar Orders Immediate Panchanama Due To Heavy Rain — महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, रायगड, रत्नागिरी, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
अजित पवार यांनी आपल्या अधिकृत X (ट्विटर) अकाउंटवरून माहिती दिली की, राज्यातील पावसामुळे झालेल्या शेती, पिक, पशुधन आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
“मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन परिस्थितीची, मदतकार्याची माहिती मी घेतली आहे. शेतीच, पिकांच, पशुधनाच, घरांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत,” — अस अजित पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केल आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून, घाट परिसरात पावसाची तीव्रता अधिक जाणवते. पवार यांनी प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बचाव आणि मदतकार्य तत्काळ राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रेल्वेसेवा ठप्प, कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन
मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवांवर पावसाचा परिणाम दिसून आला असून, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील सेवांमध्ये अडथळे आले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपापल्या भागात राहून नागरिकांना मदतीसाठी पुढे सरसावण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याच आवाहन
पावसाचा जोर असलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावं, अशा सूचना देण्यात आल्या असून, घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर कराव, अस पवार यांनी सांगितल.
राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांनी मदत कार्य करताना स्वतःचीही काळजी घ्यावी, असही त्यांनी सांगितल आहे.
🔴 हेही वाचा 👉 दरमहा फक्त ₹1500 गुंतवून बना लखपती, जाणून घ्या संपूर्ण गणित.