मुंबई | ४ जून २०२५ : Bakra Eid Livestock Market Ban Withdrawn Maharashtra News – महाराष्ट्रात बकरी ईदच्या (Bakra Eid 2025) पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद करण्याचा घेतलेला निर्णय अखेर राज्य सरकारने मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीनंतर सरकारने पशू बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि मुस्लिम समाजात समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी ३ ते ७ जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या शिफारसीनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) जनावरांची खरेदी-विक्री बंद करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, या सल्ल्यावर समाजातून तीव्र नाराजी व्यक्त झाली, त्यानंतर आयोगाने ७ मेचा सल्ला अधिकृतपणे मागे घेतला आहे.
सरकारने स्पष्ट केल आहे की, गाय व तिच्या वंशाच्या खरेदी-विक्रीवर मात्र बंदी कायम राहणार आहे, परंतु इतर जनावरांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी गौसेवा आयोगाच्या अधिकारांवर सवाल उपस्थित करताना सांगितले की, “त्यांना केवळ शिफारस करण्याचा अधिकार आहे, आदेश देण्याचा नाही.” काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनीही या निर्णयाचे स्वागत करत “शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे” म्हटले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बकरी ईदच्या तोंडावर निर्माण झालेल तणावाच वातावरण आता निवळण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : 9 लाख महिलांनी घेतला बेकायदेशीर लाभ? सरकारी योजनांमधील मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर.