Bank Holiday 12 May Maharashtra : 12 मे 2025 रोजी, सोमवारच्या दिवशी महाराष्ट्रात बँकांना सुट्टी असणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ही सुट्टी जाहीर करण्यात आली असून, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत समाविष्ट आहे. विशेष म्हणजे, 10 आणि 11 मे हे शनिवार आणि रविवार असल्याने आधीच बँका बंद होत्या. त्यामुळे सलग तीन दिवस बँक व्यवहारासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई, नागपूर यांसह राज्यातील प्रमुख शहरांमधील सर्व सार्वजनिक आणि खासगी बँक शाखांना ही सुट्टी लागू होणार आहे. यामध्ये एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, पीएनबी आणि बीओबी, कोटक महिंद्रा बँक यांसारख्या बँकांचाही समावेश आहे. त्यामुळे ज्यांना बँकेत प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करायचे आहेत, त्यांनी आपले नियोजन पुढील खुल्या दिवसांसाठी करणे गरजेचे आहे.
मे महिन्यात याव्यतिरिक्तही काही प्रादेशिक सुट्ट्या आहेत. 16 मे रोजी सिक्कीम दिनानिमित्त गंगटोकमध्ये, 26 मे रोजी काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त आगरतळा येथे, आणि 29 मे रोजी शिमला येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. याशिवाय, 18, 24 आणि 25 मे हे रविवार आणि चौथे शनिवार असल्याने त्या दिवशीही बँका बंद असतील.
सुट्टीच्या काळात शाखांमधील प्रत्यक्ष सेवा उपलब्ध नसली, तरी UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या डिजिटल माध्यमांतून व्यवहार सुरळीत सुरु असतात. त्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांनी डिजिटल सेवा वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
🔴 हेही वाच 👉 घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, आता RTOला भेट न देता होणार सगळ काम ऑनलाइन.