Bank of Maharashtra ने कमी केले व्याजदर; गृहकर्ज, कार लोन स्वस्त, मासिक EMI मध्ये घट

2 Min Read
Bank Of Maharashtra Loan Interest Rate Cut June 2025

Bank Of Maharashtra Loan Interest Rate Cut June 2025 : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक, Bank of Maharashtra ने ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बँकेने गृहकर्ज, कार लोन आणि इतर किरकोळ कर्जांवरील व्याजदरात लक्षणीय कपात जाहीर केली आहे. नवीन दर १० जूनपासून लागू झाले असून, त्यानुसार गृहकर्ज फक्त ७.३५% दराने तर कार लोन ७.७% दराने मिळणार आहे.

आरबीआयच्या रेपो दर कपातीनंतर बँकांचा प्रतिसाद

६ जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. त्यानंतर Bank of Maharashtra सहित इतर बँकांनीही त्यानुसार आपल्या कर्ज व्याजदरांमध्ये घट केली आहे. बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ही व्याजदर कपात ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार किफायतशीर आणि सुलभ कर्ज सुविधा देण्यासाठी करण्यात आली आहे.

इतर बँकांचाही दरकपातीत सहभाग

फक्त बँक ऑफ महाराष्ट्र नव्हे, तर Bank of India आणि Punjab National Bank (PNB) यांनीही आपल्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट्स (RLLR) मध्ये कपात केली आहे. या बँकांनी आपले RLLR ८.८५% वरून ८.३५% पर्यंत खाली आणले आहेत. मात्र, MCLR आणि बेस रेटमध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

Bank of Baroda ने देखील MCLR दरांमध्ये विविध कालावधीसाठी ०.५०% पर्यंत कपात केली आहे, ज्यामुळे अल्पकालीन कर्ज घेतलेल्या ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.

व्याजदर कपात ग्राहकांसाठी फायदेशीर

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही व्याजदर कपात ग्राहकांसाठी सुखद बातमी आहे. विशेषतः गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींना ही संधी अधिक लाभदायक ठरणार आहे. कमी व्याजदरामुळे मासिक EMI मध्येही घट होणार असून, यामुळे आर्थिक भार कमी होईल.

हेही वाचा : ७/१२ उताऱ्यातील बदलांवर महसू विभागाची कडक कारवाई, अनेक वर्षांपासून प्रलंबित वाद मार्गी.

Share This Article