फक्त ५ वर्षांसाठीच वैध असलेल हे आधार कार्ड कोणासाठी आवश्यक आहे? Blue Aadhaar Card

2 Min Read
Blue Aadhaar Card Validity Benefits How To Apply

Blue Aadhaar Card Validity Benefits How To Apply : भारतात आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते. विविध सरकारी योजनांपासून ते वैयक्तिक ओळखीपर्यंत अनेक ठिकाणी आधार क्रमांकाची आवश्यकता असते. सामान्यतः सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याच पाहायला मिळत. मात्र, लहान मुलांसाठी एक खास प्रकारच आधार कार्ड असत – ज्याला ‘ब्लू आधार कार्ड’ किंवा ‘बाल आधार’ अस म्हटल जात.

ब्लू आधार कार्ड विशेषतः ५ वर्षांखालील मुलांसाठी तयार केल जात. हे कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून जारी केल जात आणि यामध्ये १२ अंकी युनिक आधार क्रमांक असतो. यामध्ये बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही, कारण त्या वयात बायोमेट्रिक डेटा स्थिर राहत नाही. त्यामुळे या कार्डावर फक्त मुलाच छायाचित्र असत. हे कार्ड मूलाच्या जन्म प्रमाणपत्रासोबत आई-वडिलांच्या आधार क्रमांकाचा संदर्भ घेऊन तयार केल जात.

ब्लू आधार कार्डची वैधता केवळ पाच वर्षांपर्यंत असते. जेव्हा मूल पाच वर्षांच होत, तेव्हा UIDAI च्या नियमानुसार हे कार्ड अपडेट करण बंधनकारक होत. त्यानंतर बायोमेट्रिक माहिती घेऊन नियमित आधार कार्डमध्ये हे रूपांतरीत केल जात. त्यामुळे पालकांनी पाचव्या वाढदिवसानंतर कार्ड अपडेट करण आवश्यक आहे, अन्यथा कार्डचा वापर मर्यादित होतो.

ब्लू आधार कार्डसाठी ऑनलाइन पद्धतीनेही नोंदणी करता येते. त्यासाठी UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट बुक करावी लागते. यामध्ये पालकांचा आधार क्रमांक, पत्त्याचा पुरावा आणि मुलाच बर्थ सर्टिफिकेट आवश्यक असत. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंदाजे ६० दिवसांच्या आत पोस्टाद्वारे कार्ड घरी पोहोचवल जात.

हेही वाचा : PF खात्यातून काढा आता थेट ATM द्वारे किंवा UPI च्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम.

Share This Article