Caste Certificate Online Maharashtra 2025 : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने आता जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीमुळे अर्जदारांना सरकारी कार्यालयांचे फेरे, दलालांचा त्रास आणि कागदपत्रांची गुंतागुंत टळणार आहे.
राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या सहकार्याने एक संगणकीकृत प्रणाली विकसित करण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. येत्या काही आठवड्यांत ही प्रणाली कार्यान्वित होणार असून, अर्जदारांना घरबसल्या एका क्लिकवर जात प्रमाणपत्र मिळणार आहे.
नवे ऑनलाईन प्रमाणपत्र प्रणालीची वैशिष्ट्ये
एकत्रित अर्ज प्रक्रिया: एकाच अर्जातून जात आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणार.
आधार लिंक पडताळणी: अर्जदाराची माहिती थेट आधार डेटाशी जोडली जाईल, ज्यामुळे पडताळणी जलद होईल.
AI आधारित दस्तावेज चाचणी: डिजीलॉकर प्लॅटफॉर्मशी समन्वय करून कागदपत्रांचे सत्यापन.
चुकीच्या नोंदींना तत्काळ दुरुस्तीची सुविधा.
दलालमुक्त आणि पारदर्शक व्यवस्था: अर्जदार थेट प्रणालीतून प्रमाणपत्र प्राप्त करेल, कोणत्याही मध्यस्थांशिवाय.
कोणाला होणार फायदा?
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक प्रवेश, निवडणूक आरक्षण व विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे.
ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर कोणतेही शुल्क न देता, एका क्लिकवर प्रमाणपत्र PDF स्वरूपात मिळवता येणार आहे. त्यामुळे डिजिटल महाराष्ट्रच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
हेही वाचा : रेशन कार्ड सुरु ठेवायचे असेल तर ‘ही’ शेवटची तारीख लक्षात ठेवा.