Central Government News 2025 : केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना नोशनल इन्क्रिमेंट (मानांकित वेतनवाढ) चा लाभ मिळणार आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 20 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आदेशाच्या आधारे घेण्यात आला आहे.
नवीन नियम काय आहे?
मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, जे कर्मचारी वेतनवाढीच्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 जून किंवा 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होतात, त्यांना 1 जुलै किंवा 1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या वेतनवाढीचा लाभ मानांकित स्वरूपात मिळणार आहे.
याआधी या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वेतनवाढ मिळत नव्हती कारण ते वेतनवाढीच्या दिवशी सेवा निवृत्त होऊन गेलेले असतात. परंतु आता, सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निर्णयानंतर सरकारने ह्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.
महागाई भत्त्याची स्थिती
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 55% इतका आहे.
ही वाढ मार्च 2025 मध्ये लागू करण्यात आली होती.
पुढील महागाई भत्ता वाढ जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी जाहीर होणार आहे.
अशी शक्यता आहे की ही वाढ 7व्या वेतन आयोगांतर्गत शेवटची वाढ असेल, कारण 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.
एनपीएस कर्मचार्यांसाठी मागणी
अखिल भारतीय एनपीएस कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंजीत सिंह पटेल यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोशनल इन्क्रिमेंट देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
🔴 हेही वाचा 👉 Aadhaar कार्ड हरवले? आधार मिळवण्यासाठी सरकारने दिला सोपा पर्याय – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.