Ci3t Skill Center Roha: कोकणातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! रोहा येथे जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारणार

1 Min Read
Ci3t Skill Center Roha Ajit Pawar Tata Technology

Ci3t Skill Center Roha Ajit Pawar Tata Technology : कोकणातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या पुढाकाराने रोहा (रायगड) येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण देणारे सीट्रिपलआयटी (CI3T) केंद्र उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी ₹105 कोटींचा खर्च होणार असून, टाटा टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्त सहकार्याने हे प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे.

3 हजार युवकांना दरवर्षी प्रशिक्षण

या केंद्रात दरवर्षी 3000 युवकांना अत्याधुनिक औद्योगिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन, डिजिटायझेशन यासारख्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाईल, जे उद्योगांची सध्याची गरज ओळखून तयार केले गेले आहे.

कोकणातच रोजगाराच्या संधी

या उपक्रमामुळे रायगडसह संपूर्ण कोकणातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. कुशल मनुष्यबळ तयार झाल्यामुळे उद्योगांना स्थानिक पातळीवर कामगार मिळतील आणि कोकणात उद्योगपूरक वातावरण निर्माण होईल. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

🔴 हेही वाचा 👉 घरबसल्या नवीन आधार कार्ड बनवा, UIDAI ची नवीन सुविधा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

Share This Article