मुंबई | १३ जून २०२५ : Dangerous Android Apps Warning Delete These Apps Immediately 2025 — भारतातील कोट्यवधी Android यूजर्ससाठी सायबर सुरक्षेचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. CIRIL (Cyber Research and Intelligence Labs) या सायबर सुरक्षा संस्थेने धोकादायक अॅप्सची यादी जाहीर केली असून, हे अॅप्स यूजर्सच्या फोनमधून तातडीने हटवण्याची सूचना देण्यात आली आहे.
या अॅप्सच्या माध्यमातून खाजगी डेटा, बँकिंग तपशील, क्रिप्टो वॉलेट माहिती चोरी केली जात होती. गुगलने यापैकी अनेक अॅप्स हटवले असले तरी, अनेक यूजर्सच्या मोबाईलमध्ये यातील काही अॅप्स अजूनही अस्तित्वात असण्याची शक्यता आहे.
CIRIL ने जाहीर केली धोकादायक अॅप्सची यादी
हे अॅप्स यूजरच्या वॉलेट रिकव्हरी की, पासवर्ड्स व अकाउंट डिटेल्स चोरी करून संपूर्ण क्रिप्टो अॅसेट्सवर ताबा मिळवत होते. खालील अॅप्स तातडीने डिलीट करावेत:
Suiet Wallet
SushiSwap
Raydium
Hyperliquid
BullX Crypto
Pancake Swap
OpenOcean Exchange
Meteora Exchange
Harvest Finance Blog
हे अॅप्स डिलीट कसे करावे?
- सेटिंग्स > अॅप्स मध्ये जा
- संबंधित अॅप निवडा आणि Uninstall करा
- जर Uninstall होत नसेल तर: सेटिंग्स > Security > Device Admin Apps
तिथे अॅपचा अॅक्सेस डिसेबल करा
नंतर पुन्हा Uninstall करा
तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?
Two-Factor Authentication (2FA) चालू करा
अनोळखी लिंक किंवा मेसेजवरून अॅप डाउनलोड करू नका
अॅप्स फक्त Google Play Store किंवा अधिकृत वेबसाईटवरूनच डाउनलोड करा
वेळोवेळी क्रिप्टो वॉलेट किंवा बँकिंग अॅप्सचे रिव्ह्यू करा
बँक डिटेल्स चोरले जाण्याची शक्यता
या अॅप्समुळे हजारो वापरकर्त्यांचे क्रिप्टो वॉलेट्स आणि बँक अकाउंट्स डिटेल्स चोरले जाण्याची शक्यता होती. सामान्य यूजर्सनी अशा अॅप्सपासून सावध राहणे, व फसवणूक झाल्यास त्वरित सायबर क्राईम पोर्टल (cybercrime.gov.in) वर तक्रार करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : राज्यात मान्सून सक्रीय — ‘येथे’ रेड अलर्ट! राज्यातील ईतर भागात हवामानाची काय परिस्थिती? हवामान खात्याचा अंदाज.