EPF Interest Rate 2025 Update EPFO : खासगी नोकरी करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (Employee Provident Fund Organisation) आर्थिक वर्ष 2024-25 साठी EPF डिपॉझिटवर 8.25% इतका व्याज दर देण्याचा निर्णय घेतला असून, यास आता केंद्र सरकारकडूनही अंतिम मंजुरी मिळाली आहे.
28 फेब्रुवारी 2025 रोजी EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय कामगार मंत्री मन्सुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत EPF वरील व्याज दरात वाढ करून 8.15% वरून 8.25% करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. आणि आता 22 मे रोजी अर्थ मंत्रालयाकडून या दरास मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयाचा 7 कोटीहून अधिक EPFO सदस्यांना थेट लाभ होणार आहे. EPF खात्यात जमा रकमेवर आता नव्या आर्थिक वर्षासाठी 8.25% दराने व्याज जमा होणार आहे.
गेल्या काही वर्षांत EPF वरील व्याज दरात चढ-उतार झाल्याचे दिसते. मार्च 2022 मध्ये हा दर 8.5% वरून 8.1% इतका कमी करण्यात आला होता, जो मागील चार दशकांतील सर्वात कमी दर होता.
EPF योजना कशी कार्य करते?
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12% रक्कम EPF खात्यात जमा होते आणि त्याचप्रमाणे नियोक्ताद्वारेही तेवढीच रक्कम जमा केली जाते. यातील काही हिस्सा EPS (पेंशन योजना) मध्ये वळवला जातो. निवृत्तीनंतर कर्मचारी संपूर्ण रक्कम एकरकमी मिळवू शकतात, तसेच मासिक पेंशनही सुरू होते.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजनेसाठी इतर योजनांचा बळी? बनली ‘सरकारसाठी डोकेदुखी.