EPFO Aadhaar UAN Linking Deadline ELI Scheme : EPFO (कर्मचारी भविष्य निधी संघटना) ने नोकरदारांना मोठा दिलासा देत UAN Activation आणि बँक खात्याशी आधार लिंकिंग करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. ही सवलत Employment Linked Incentive (ELI) Scheme अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.
नव्याने नोकरीत रुजू झालेल्यांसाठी मोठी संधी
जे कर्मचारी चालू आर्थिक वर्षात नवीन नोकरीत रुजू झाले आहेत, त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ELI Scheme जाहीर केली होती, जिचा उद्देश म्हणजे नवतरुणांना औपचारिक रोजगारात आणणे आणि कंपन्यांना नव्या भरतीसाठी प्रेरित करणे.
DBT द्वारे थेट खात्यात लाभ
या स्कीमअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना थेट बँक खात्यात निधी (DBT – Direct Benefit Transfer) पाठवला जातो. त्यामुळे UAN सक्रिय करणे आणि बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे.
पहिला सर्क्युलर 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाला होता आणि त्यात अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती, मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून आता ही डेडलाइन 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा – ११ वर्षांत केन्द्र सरकारच्या योजनांचा उद्देश: ‘गरीबांच कल्याण, देशाचा विकास’.