EPFO PF Balance Check And Pension Update 2025 : देशातील सुमारे 7 कोटी कामगारांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. EPFO पोर्टल वापरताना अनेकदा भासणाऱ्या संथ गतीच्या समस्येला आता पूर्णविराम मिळणार आहे. नव्या वर्षात EPFO ने डिजिटल सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. या सुधारांमुळे PF बॅलन्स तपासणे, पैसे काढणे आणि पेन्शन मिळवणे अधिकच सुलभ होणार आहे. पाहूया काय आहेत या EPFO च्या महत्त्वाच्या सुधारणा…
आता PF बॅलन्स ‘मिस्ड कॉल’वर
EPFO सदस्य आता 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपला PF बॅलन्स सहज तपासू शकतात. यासाठी UAN सक्रिय असण आणि KYC पूर्ण असण गरजेच आहे. दोन रिंग झाल्यावर कॉल आपोआप कट होईल आणि PF बॅलन्सचा SMS लगेच येईल.
SMS द्वारे बॅलन्सची माहिती
EPFO सदस्य 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN <Language Code>
असा SMS पाठवून PF बॅलन्स पाहू शकतात. उदाहरणार्थ, हिंदीसाठी “HIN” व मराठीसाठी “MAR” हा कोड वापरावा लागतो. ही सेवा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
प्रोफाइल अपडेट करण झाल अगदी सोप
यापुढे सदस्यांना नाव, जन्मतारीख, लिंग यांसारखी वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासाठी नियोक्त्याच्या मंजुरीची गरज नाही. आधारशी लिंक असलेल्या UAN नंबरद्वारे हे सर्व काही ऑनलाइन करता येईल.
PF खात्याच ट्रान्सफर आता सुपरफास्ट
15 जानेवारी 2025 पासून जुन्या नियोक्त्याची मंजुरी न घेता EPFOच्या वेबसाईटवरून PF ट्रान्सफर करता येणार आहे. यामुळे अनेक सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पेन्शन पेमेंट प्रणाली झाली ‘सेंट्रलाइज्ड’
EPFO ने CPPS (Centralised Pension Payment System) सुरू केल्याने पेन्शन थेट बँक खात्यात जमा होईल. यापूर्वी विभागीय कार्यालयांमधील PPO ट्रान्सफरमुळे पेन्शन देण्यात विलंब होत असे, तो आता दूर होईल.
एकूण फायदे
EPFOच्या या नव्या सुधारांमुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना जलद, पारदर्शक आणि सोप्या सेवा मिळणार आहेत. या सुधारणा डिजिटल युगात एक मोठ पाऊल मानल जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 मुलीच्या भविष्याची चिंता सोडा; ही सरकारी योजना आहे, सविस्तर माहिती जाणून घ्या.