Fastag One Time Payment Unlimited Highway Travel 2025 : केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय महामार्गांसाठी एक नवीन टोल धोरण आणण्याच्या तयारीत असून, या धोरणामुळे वाहनचालकांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. या अंतर्गत आता एकदाच वार्षिक शुल्क भरून वर्षभर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
वार्षिक पास आणि अंतरावर आधारित दर:
नवीन प्रस्तावित धोरणानुसार वाहनधारकांना दोन पर्याय उपलब्ध असतील:
- Annual Pass: एकदाच FASTag मध्ये ₹3,000 भरा आणि वर्षभर कोणत्याही राष्ट्रीय महामार्ग, राज्य एक्सप्रेसवे किंवा इतर द्रुतगती मार्गांवर अमर्यादित प्रवास करा.
- Distance-Based Pricing: वार्षिक पास न घेणाऱ्यांसाठी प्रत्येक 100 किलोमीटरसाठी ₹50 चा स्थिर दर आकारला जाईल. यामुळे सध्याचे टोल प्लाझा हटवण्यात येतील.
FASTag खात्याचेच पुढे वापर करता येणार असून, नवीन कागदपत्रांची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने याआधी विचाराधीन असलेल्या ₹30,000 च्या 15 वर्षांसाठीच्या ‘लाइफटाइम पास’ संकल्पनेलाही आता मागे घेतले आहे.
टोल प्लाझा होणार बंद, सेन्सरवर आधारित वसुली:
नवीन धोरणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे टोल प्लाझांचा संपूर्णपणे अंत. याऐवजी सेन्सरवर आधारित टोल वसुली केली जाईल. यामुळे वाहतूक अधिक गतीमान होईल आणि थांबण्याची गरज भासणार नाही.
ठेकेदारांना नुकसानभरपाई:
या नव्या प्रणालीमुळे विद्यमान ठेकेदारांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालय (MoRTH) ठेकेदारांना डिजिटल रेकॉर्ड व एक विशिष्ट सूत्रानुसार नुकसानभरपाई देणार आहे.
बँकांना मिळणार अधिकार:
टोल चोरी टाळण्यासाठी बँकांना किमान बॅलन्स यासारख्या अटी लागू करण्याचे अधिकारही देण्यात येणार आहेत.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना मिळणार ₹40,000 कर्ज – हफ्ते फेडण्याची गरज नाही.