Free Aadhaar Update : ज्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी १४ जून २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेनंतर मोफत सेवा बंद होणार असून नागरिकांना त्यासाठी जवळच्या आधार केंद्रात जाऊन प्रक्रिया करावी लागणार आहे आणि त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.
UIDAI च्या आधार नोंदणी व अद्ययावत नियम २०१६ नुसार, प्रत्येक व्यक्तीने १० वर्षांच्या कालावधीत आपली ओळख व पत्ता पुरावा अपडेट करण अनिवार्य आहे.
आधार कार्ड मोफत ऑनलाइन अपडेट कसे करायचे?
UIDAI च्या myAadhaar पोर्टल द्वारे खालील पद्धतीने मोफत आधार अपडेट करता येईल:
- आपल्या ब्राउझरमध्ये https://myaadhaar.uidai.gov.in ही वेबसाईट उघडा.
- आपल्या आधार क्रमांकासह लॉगिन करा. OTP प्राप्त करून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा.
- डॅशबोर्डमध्ये “Document Update” या पर्यायावर क्लिक करा.
- पत्ता व ओळखपत्र निवडा आणि संबंधित दस्तऐवज JPEG, PNG किंवा PDF स्वरूपात (२MB पेक्षा कमी साइजमध्ये) अपलोड करा.
- डॉक्युमेंट सबमिट केल्यावर तुम्हाला एक SRN (Service Request Number) मिळेल, ज्याद्वारे तुम्ही आधार अपडेटची स्थिती पाहू शकता.
जर तुम्हाला फोटो किंवा बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करायचे असतील, तर त्यासाठी आधार नोंदणी केंद्रात प्रत्यक्ष भेट देण आवश्यक आहे.
अंतिम मुदत लक्षात ठेवा
१४ जून २०२५ ही मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख आहे. त्यानंतर ही सेवा सशुल्क (₹५०) होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana May महिन्याचे पैसे कधी जमा होणार? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.