मुंबई | २६ मे २०२५: Heavy Rain Alert In Maharashtra Eknath Shinde Orders Administration To Stay Alert – मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसारख्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मदत व बचाव कार्य तत्काळ आणि प्रभावीपणे पार पाडले जावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते महानगरपालिका आयुक्तांपर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी थेट संपर्क साधून सूचना दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांतील हवामान स्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश देताना, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यासाठी यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पावसामुळे पाण्याने भरलेले रस्ते, पूल, ढासळत्या इमारती आणि विजेच्या तारांची स्थिती यावरही विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईसारख्या महानगरांमध्ये उपनगरी रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी आणि गरज पडल्यास प्रवाशांना पर्यायी सोयी सुविधा पुरवाव्यात, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांना त्यांनी आवाहन केले आहे कि – हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये आणि सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगावी.
राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून, प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
🔴 हेही वाचा 👉 भारतात आता आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड चालणार नाहीत! आता नागरिकत्वाचा पुरावा म्हणून चालणार फक्त ‘हे’.