Heavy Rain Warning: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा – अदिती तटकरे यांची नागरिकांना सूचना

1 Min Read
Heavy Rain Warning Maharashtra - (प्रतिकात्मक फोटो)

Heavy Rain Warning Maharashtra : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी दिनांक २३ आणि २४ मे रोजी ‘रेड अलर्ट’ तर संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare Tatkare) यांनी दिली आहे.

अदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक प्रवास टाळण्याची, विशेषतः घाटमार्गावरून न जाण्याची सूचना केली आहे. तसेच नद्या, समुद्र व ओढ्यांच्या आसपास न जाणे, घरामध्ये सुरक्षित स्थळी थांबणे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला तात्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि बचाव यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांपासून सावध राहण्याची सूचना केली असून, माहितीची सत्यता पडताळूनच कृती करण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत कोकण भागात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

🔴 हेही वाचा 👉 तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? अशा पद्धतीने तपासा, लवकरच जाहीर होणार २०व्या हप्त्याची तारीख.

Share This Article