How To Check Pan Card Active Status Online : पॅन कार्ड हे आजच्या डिजिटल युगात एक अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. बँकेत खाते उघडणे असो, कर्ज घेणे असो किंवा आयटीआर फाईल करणे – सर्वच व्यवहारांमध्ये पॅन कार्डची आवश्यकता असते. मात्र अनेकदा आपल्या नकळत आपले पॅन कार्ड ‘इनऍक्टिव्ह’ (PAN Inactive) होऊ शकते. आणि त्यामुळे आपली अनेक महत्त्वाची कामे अडकू शकतात.
या पार्श्वभूमीवर, तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून सहजपणे पॅन कार्डचे स्टेटस (Pan Card Status) तपासू शकता. सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही फक्त काही मिनिटांत जाणून घेऊ शकता की, तुमच PAN card चालू (Active) आहे की बंद (Inactive).
पॅन कार्ड स्टेटस ऑनलाइन कस तपासाल?
- इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://www.incometax.gov.in/iec/foportal/ - Quick Links मध्ये ‘Verify PAN Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा PAN नंबर, पूर्ण नाव, जन्मतारीख व रजिस्टर्ड मोबाईल नंबर भरा.
- मोबाइलवर आलेला OTP भरून ‘Validate’ करा.
जर सर्व माहिती योग्य असेल आणि तुमच PAN कार्ड सक्रिय (Active) असेल, तर स्क्रीनवर “PAN is Active and details are as per PAN” असा मेसेज दिसेल.
पॅन कार्ड का Inactive होते?
दीर्घकाळ पॅन कार्ड वापरले नसल्यास
एका व्यक्तीचे एकाहून अधिक पॅन कार्ड असल्यास
आयटीआर न भरल्यास काही वेळेस पॅन कार्ड Inactive होण्याची शक्यता असते
महत्त्वाचे: जर पॅन कार्ड इनऍक्टिव्ह असेल, तर त्यावर आधारित आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळे वेळेत पॅन कार्ड स्टेट्स तपासून अपडेट करणे गरजेचे आहे.
🔴 हेही वाचा 👉 मोठी अपडेट; पगार रचना पूर्णपणे बदलणार! मर्जिंगमुळे मुळ पगारात प्रचंड मोठी वाढ अपेक्षित.