IMD Alert Heavy Rain Orange Yellow Maharashtra : महाराष्ट्रात मान्सूनने वेळेपुर्वीच हजेरी लावल्यानंतर हवामानात मोठा बदल झालेला असून, पुढील ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
देशात मान्सूनने झपाट्याने एन्ट्री केल्याने, पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे केरळ, पश्चिम बंगाल, सिक्किमसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भागातदेखील पावसाचा जोर वाढणार आहे.
ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेले जिल्हे:
भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर – या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, येत्या दोन दिवसांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले जिल्हे:
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव आणि नाशिक – या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचा अर्थ येथेही पावसाचा जोर राहणार असला तरी या जिल्ह्यांना तुलनात्मक स्वरूपात धोका कमी आहे. मात्र, सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३१ मे, १ जून आणि २ जून या तीन दिवसांत राज्यात पावसाचा प्रभाव अधिक तीव्र राहणार आहे. त्यानंतर थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात पूरस्थिती नियंत्रणात:
राज्यात सध्या काही भागांत नद्यांना पूर आला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याच अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, सर्व जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क सतत सुरू आहे. गेल्या २४ तासांत पावसामुळे ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकार आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्ण सज्ज असून, नागरिकांनी फसव्या बातम्यांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांनुसारच निर्णय घ्यावेत, अस आवाहन प्रशासनाकडून करण्यात आल आहे.
हेही वाचा : ‘या’ महिलांचा लाभ रोखला – अदिती तटकरे यांच स्पष्टिकरण.