Rule Change : 1 जूनपासून देशभरात लागू झाले 7 मोठे नियम; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार

3 Min Read
June 1 Rule Change LPG EPO Credit Card Mutual Fund

मुंबई | 1 जून 2025: June 1 Rule Change LPG EPO Credit Card Mutual Fund — जून महिन्याची सुरुवात देशात अनेक आर्थिक व तांत्रिक नियमांतील बदलांसह झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात झाली असली तरी या व्यतिरिक्तही असे अनेक बदल आहेत, जे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खर्चावर थेट परिणाम करणार आहेत. या बदलांमध्ये विमान प्रवास, क्रेडिट कार्ड वापर, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि EPFO मधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा यांचा समावेश आहे.

एलपीजी सिलेंडर स्वस्त – मात्र फक्त ‘या’ प्रकारासाठी

ज्या लोकांना वाटते की घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर कमी झाले असावेत, त्यांच्यासाठी ही थोडी निराशेची बातमी आहे. कारण कपात केवळ 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये हा सिलेंडर आता ₹1723.50 रुपयांना उपलब्ध आहे. तर, 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर पूर्वीइतकाच आहे.

हवाई प्रवास होणार स्वस्त?


Air Turbine Fuel (ATF) दरात कपात झाल्यामुळे संभाव्यतः विमान प्रवासाच्या तिकिटांमध्ये घट होऊ शकते. दिल्लीमध्ये ATF ची किंमत आता ₹83,072.55 प्रति किलोलीटर झाली आहे, जी पूर्वीपेक्षा हजारोंनी कमी आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नवा कट-ऑफ टाइम

SEBI च्या नव्या नियमानुसार, ओव्हरनाईट म्युच्युअल फंड स्कीम्ससाठी ऑनलाइन व्यवहारासाठी कट-ऑफ वेळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल, आणि ऑफलाइन व्यवहारासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत. यामुळे गुंतवणूक वेळेवर केल्यास दुसऱ्याच दिवशीचे दर लागू होतील.

EPFO 3.0 — पीएफ पैसे काढण होणार अत्यंत सोप

EPFO ने एक नवा डिजिटल प्लॅटफॉर्म EPFO 3.0 सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे 9 कोटींहून अधिक सदस्यांना UPI किंवा एटीएमच्या माध्यमातून थेट पीएफ रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे.

क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी बदलले नियम

Kotak Mahindra Bank च्या क्रेडिट कार्डसाठी ऑटो डेबिट फेल झाल्यास बँक आता 2% बाउन्स चार्ज लावणार आहे. हे शुल्क किमान ₹450 ते कमाल ₹5000 पर्यंत जाऊ शकते. तसेच मासिक फायनान्स चार्जही 3.5% वरून 3.75% पर्यंत वाढू शकतो.

आधार अपडेटसाठी शेवटची संधी

UIDAI ने मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2025 निश्चित केली आहे. त्यानंतर प्रत्येक अपडेटसाठी ₹50 शुल्क आकारले जाईल.

UPI व्यवहारासाठी नवा नियम

NPCI च्या नव्या नियमानुसार, UPI व्यवहार करताना आता वापरकर्त्यांना केवळ Ultimate Beneficiary च नावच दिसेल. QR कोड किंवा एडिट केलेली नावे दिसणार नाहीत. हा नियम 30 जून 2025 पर्यंत सर्व UPI अ‍ॅप्सवर लागू केला जाईल.

हेही वाचा : आजपासून या नागरिकांना मिळणार नाही रेशन! जाणून घ्या नेमक काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

Share This Article