कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय? रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी; सरकारचा जनतेला सावधगिरीचा इशारा Maharashtra Covid Cases Today

2 Min Read
Maharashtra Covid Cases Today 1 June 2025

नवी दिल्ली | 1 जून 2025 : Maharashtra Covid Cases Today 1 June 2025 — काही महिन्यांपूर्वीपर्यंत शांत झालेली कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. देशात कोविडचे सक्रिय रुग्ण ३ हजारांच्या वर गेले असून, गेल्या २४ तासांत ४ मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, काही राज्यांनी खबरदारीच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ जून २०२५ रोजी देशात ३,३९५ सक्रिय कोविड रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यात केरळमध्ये सर्वाधिक १३३६ रुग्ण असून, त्यानंतर महाराष्ट्र (४६७), दिल्ली (३७५), गुजरात (२६५), आणि कर्नाटक (२३४) अशी क्रमवारी आहे. देशभरात कोरोनाशी संबंधित चार मृत्यूही नोंदवण्यात आले आहेत.

कर्नाटक सरकारचे नवीन परिपत्रक

रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर कर्नाटक सरकारने नागरिकांना खबरदारी घेण्याच आवाहन केल आहे. त्यांनी हात धुण्याच्या सवयींवर भर देण्यासोबतच, शिंकताना किंवा खोकताना शिष्टाचार पाळणे, गर्दी टाळणे आणि आवश्यक असल्यास मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

केरळ – १३३६
महाराष्ट्र – ४६७
दिल्ली – ३७५
गुजरात – २६५
कर्नाटक – २३४
पश्चिम बंगाल – २०५
तामिळनाडू – १८५
उत्तर प्रदेश – ११७
राजस्थान – ६०
पुडुचेरी – ४१
हरयाणा – २६
मध्य प्रदेश – १६
झारखंड – ६
पंजाब – ५

मृत्यूंची कारण काय सांगतात?

दिल्लीतील ७१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनिया, सेप्टिक शॉक आणि किडनीच्या गंभीर आजारामुळे झाला. केरळमध्ये ५९ वर्षीय, कर्नाटकमध्ये ६३ वर्षीय, आणि उत्तर प्रदेशात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघेही आधीपासूनच काही गंभीर आजारांनी ग्रस्त होते.

जनतेसाठी सावधगिरीचा इशारा

तज्ज्ञांच्या मते, सध्या घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घेण अत्यावश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक, आजारपणाने ग्रस्त लोकांनी विशेष दक्षता घ्यावी. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये गंभीर लक्षण दिसण्याची शक्यता कमी आहे, तरीही लक्षण जाणवल्यास त्वरीत चाचणी करावी.

हेही वाचा : 1 जूनपासून देशभरात लागू झाले 7 मोठे नियम; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार.

Share This Article