Maharashtra Farmers Free Electricity Solar Agriculture Scheme 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केल आहे की डिसेंबर २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ चालत आलेल्या वीजप्रश्नावर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे. यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना’ (Mukhyamantri Saur Krishi Yojana) सुरु केली असून, १६,००० मेगावॅट वीज निर्मितीचा मोठा उपक्रम राबवला जात आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षभर, दिवसाचे १२ तास वीज पुरवठा केला जाईल. या निर्णयामुळे शेतीच्या वेळा अधिक अनुकूल ठरणार असून, सिंचन व पिकांची उत्पादकता वाढण्याची अपेक्षा आहे. अनेकदा रात्रीच्या वेळेस वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाल आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेही स्पष्ट केल की राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटीबद्ध आहे. यासाठी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करून दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना राबवली जात आहे. सौर कृषी योजनेतून केवळ मोफत वीजच नव्हे, तर राज्यात स्वच्छ ऊर्जा निर्माण व पर्यावरण रक्षण हेदेखील साध्य होणार आहे.
राज्यात विविध विकास योजनांमध्ये सौर ऊर्जा केंद्रांची उभारणी सुरु असून, त्यातून निर्माण होणारी वीज थेट शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. हे केंद्र ग्रामपातळीवर उभारण्यात येणार असून स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल. या उपक्रमातून केवळ वीजबचतच नव्हे, तर शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरणही होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 शेतीच्या वाटणीसाठी आता लागणार केवळ ५०० रुपये; महसूल विभागाचा मोठा निर्णय.