Monsoon 2025 : राज्यात मान्सूनने तब्बल 12 दिवस आधीच आगमन केल्याने हवामान विभागाने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाl या राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या तिन्ही राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने २६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, २७ मेपासून १ जूनदरम्यान पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण, घाटमाथा आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वादळ, विजांचा कडकडाट, सुसाट्याचे वारे (40-50 किमी/तास) आणि अतिवृष्टीसह काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत 26 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही मान्सूनची गेल्या 19 वर्षांतील सर्वात लवकर नोंदवलेली गेलेली एंट्री आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही अतिवृष्टीची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 4 मृत्यू, 868 घरांचे नुकसान, 5 मदतछावण्या कार्यान्वित
केरळमध्ये मान्सूनमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून 29 घरे पूर्णतः तर 868 घरे अंशतः बाधित झाली आहेत. वायनाड, इडुक्की आणि कोझिकोड जिल्ह्यांत मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. अनेक भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, झाडे कोसळणे, नदी-नाल्यांना पूर येणे अशा घटना समोर येत आहेत.
मत्स्यव्यवसायावर बंदी
पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर मासेमारीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळ, कर्नाटका, गोवा, लक्षद्वीप, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे मासेमारी पूर्णतः थांबवण्यात आली आहे.
🔴 हेही वाचा 👉 रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार दरमहा १००० रुपये; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या.