मुंबई, १० जून २०२५ : Maharashtra Liquor Price Hike IMFL Deshi Foreign Brand Rates 2025 – राज्य सरकारने मद्यविक्रीवरील करात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (IMFL) तसेच देशी व विदेशी ब्रँडवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्याच्या महसुलात तब्बल १४,००० कोटी रुपयांची वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मद्यपींना एका क्वार्टरसाठी (१८० मिली) देशी दारूसाठी ८० रुपये, महाराष्ट्र मेड लिकरसाठी १४८ रुपये, IMFL साठी २०५ रुपये तर विदेशी प्रीमियम ब्रँडसाठी ३६० रुपये मोजावे लागणार आहेत.
या निर्णयामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. मागील काही दिवसांपासून बिअरच्या किंमती कमी होणार असल्याच्या बातम्यांमुळे आनंदित झालेल्या ग्राहकांना आता इतर मद्यप्रकारांमध्ये मात्र वाढीचा सामना करावा लागणार आहे.
कोणते मद्य किती दराने उपलब्ध?
देशी दारू: ₹८० (१८० मिली)
महाराष्ट्र मेड लिकर: ₹१४८ (१८० मिली)
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (IMFL): ₹२०५ (१८० मिली)
विदेशी प्रीमियम ब्रँड: ₹३६० (१८० मिली)
उत्पादन शुल्क विभागात सुधारणा व नव्या भरतीस मान्यता
मद्यविक्रीवर करवाढीच्या निर्णयासोबतच, राज्य उत्पादन शुल्क विभागाला बळकट करण्यासाठी १,२२३ नव्या पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई शहर व उपनगरासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार असून, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नवीन अधीक्षक कार्यालये स्थापन होणार आहेत.
यासोबतच, उत्पादन व विक्रीच्या प्रक्रियेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी एआय (AI) आधारित कंट्रोल रूम विकसित केली जाणार आहे.
सीलबंद विदेशी मद्याच्या विक्रीसाठी हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये भाडेतत्त्वावर कराराद्वारे विक्री करण्यासही परवानगी देण्यात आली असून, यावर १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
ब्रिटीश बिअर स्वस्त तर दारू महाग
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारत-ब्रिटन FTA करारामुळे देशात विकली जाणारी ब्रिटीश बिअर ७५ टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार असल्याची बातमी आली होती. परंतु, महाराष्ट्र सरकारच्या ताज्या निर्णयामुळे अन्य प्रकारच्या दारूच्या किंमती मात्र वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : तीन दिवसांच्या आत हे महत्वाचं काम करण गरजेच, ही असणार आहे अंतिम संधी.