Monsoon 2025: कोकणात अतिमुसळधार, रायगडसह अनेक जिल्ह्यांना हायअलर्ट – तुमच्या जिल्ह्याच काय? जाणून घ्या

2 Min Read
Maharashtra Monsoon 2025

मुंबई | २५ मे २०२५ : Maharashtra Monsoon 2025 — नैऋत्य मान्सून यंदा अपेक्षेपेक्षा बारा दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झाला असून, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांना सतर्क करण्यात आल असून, नागरिकांनाही आवश्यक खबरदारी घेण्याच आवाहन करण्यात आल आहे.

Rain Alert: कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘अतिमुसळधार’ पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे शहरांसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानुसार, मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर — विशेषतः पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये — अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही येलो अलर्ट जारी केला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, या भागांतील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. औरंगाबाद, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात.

मान्सूनच्या आगमाणामुळे शेतीसाठी एकीकडे आनंदाची बातमी असली, तरी दुसरीकडे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याच आवाहन करण्यात आल आहे. मच्छीमारांनाही पुढील काही दिवस खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या पुढील अंदाजानुसार, राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण गरजेच आहे.

🔴 हेही वाचा 👉 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, आता अ‍ॅपवरून करा अर्ज.

Share This Article