मुंबई | १ जून २०२५: Maharashtra Monsoon Delayed Rain Update Kharif Sowing Warning 2025 – महाराष्ट्रात मान्सूनच आगमन अपेक्षेपेक्षा धीम्या गतीने सुरू असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या १० जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. फक्त काही किनारपट्टी भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागांमध्ये कोरड हवामान कायम राहण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम खरीप पेरणीवर होऊ शकतो, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
राज्यात सध्या तापमानात वाढ झाली असून विदर्भात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास, तर मराठवाडा आणि खानदेशात ३५ ते ४० अंशांदरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पेरणीसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खात्रीशीर हवामान माहिती घेणं गरजेचं आहे, अस कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आल आहे.
मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हलक्या सरींची शक्यता
१ ते ४ जून दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये पुढील ४८ तासात जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे.
ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान
दुसरीकडे, ईशान्य भारतात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम आणि आसाममध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. सिक्कीममध्ये सुमारे १५०० पर्यटक अडकले असून, मेघालयमध्ये भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.
कृषी विभागाच शेतकऱ्यांना आवाहन
राज्यातील हवामानाचा विचार करता, कोरडवाहू शेतकऱ्यांनी सध्या कोणतीही पेरणी करू नये, अस आवाहन कृषी विभागाने केल आहे. हवामान खात्याकडून पुढील पावसाचा अचूक अंदाज येईपर्यंत वाट पाहण हेच शहाणपणाच ठरणार आहे.
हेही वाचा : या सरकारी योजनेतून इंटर्नशिपमध्ये मिळणार २०,००० रुपये! MeitY कडून विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी.