महावितरणने जाहीर केला ‘हाय अलर्ट’ – आपत्कालीन परिस्थितीत या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा Maharashtra Rain Alert Mahavitaran

1 Min Read
Maharashtra Rain Alert Mahavitaran High Alert Power Supply Guidelines

Maharashtra Rain Alert Mahavitaran High Alert Power Supply Guidelines : अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, महावितरण विभागाने राज्यभरात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी सर्व मुख्यालय आणि परिमंडल कार्यालयांना निर्देश दिले आहेत की, कोणतीही गाफीलपणा चालणार नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास, तो तातडीने आणि प्राधान्याने सुरू करावा, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणचे महत्त्वाचे निर्देश:

२४x७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू
वीजपुरवठा खंडित झाल्यास एसएमएस, सोशल मिडिया, आणि स्थानिक माध्यमांतून नागरिकांना तत्काळ माहिती द्यावी
मोठ्या बिघाडाच्या ठिकाणी वरिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून दुरुस्ती कामे पाहावीत
आवश्यक उपकरणे, खांब, तार, ट्रान्सफॉर्मर, ऑईल इ. स्टॉक मध्ये सज्ज ठेवावे
मनुष्यबळ, यंत्रसामग्री, वाहने युद्धपातळीवर तयार ठेवण्याचे आदेश

तज्ज्ञांचा इशारा आहे की, जोरदार वाऱ्यामुळे वीजतारा व खांबांना नुकसान होण्याची शक्यता असून, नागरिकांनी वीज खांबांपासून दूर राहावे.

राज्य शासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व महावितरण यंत्रणा पूर्ण सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक महावितरण कार्यालयाशी किंवा 1912 किंवा 19120 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

🔴 हेही वाचा 👉 कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी – लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करा.

Share This Article