Maharashtra Rain Relief: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 Min Read
Maharashtra Rain Relief Devendra Fadnavis Financial Aid

मुंबई | २७ मे २०२५ : Maharashtra Rain Relief Devendra Fadnavis Financial Aid — महाराष्ट्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाल आहे. शेतजमिनी, पिक, आणि घरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आर्थिक मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये मदत व बचाव कार्यासाठी पथकांची आधीच तैनाती करण्यात आली आहे,

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरण करण्यात आल. यामध्ये मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील गंभीर परिस्थिती स्पष्ट झाली. विशेषतः मुंबईतील कोलाबा परिसरात जवळपास २०० मिमी इतका पाऊस पडल्याच नोंदवण्यात आल, जे अत्यंत दुर्मिळ मानल जात.

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत मंजूर असलेल्या निकषांनुसार शेतकरी आणि सामान्य नागरिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. पावसामुळे घरांच किंवा शेती पिकांच नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर मदतीचा लाभ देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

महसूल विभागाने यासंबंधी जिल्हास्तरावर पंचनामे सुरू केले असून, ज्या भागांमध्ये पुराचा धोका अधिक आहे तिथे मदत पथके आधीच तैनात करण्यात आले आहेत. आपत्तीच्या क्षणी त्वरीत मदत पोहोचवण आणि नुकसानीची तीव्रता कमी करण हा यामागील उद्देश आहे.

राज्य शासनाच्या या तात्काळ निर्णयामुळे संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागान पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.

🔴 हेही वाचा 👉 घरकुल योजनेचा निधी घर बांधण्याऐवजी इतर कारणांसाठी खर्च केला? कडक कारवाई होणार.

Share This Article