महाराष्ट्रातील अनेक भागांना हवामान विभागाचा रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा Maharashtra Red Alert Heavy Rain Warning

2 Min Read
Maharashtra Red Alert Heavy Rain Warning May 2025

मुंबई | २७ मे २०२५ : Maharashtra Red Alert Heavy Rain Warning May 2025 — महाराष्ट्रात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा दहा दिवस आधीच दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही भागांसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, येत्या काही दिवसांत अतिवृष्टीसदृश्य ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कोकण, पश्चिम घाट भाग, मध्य महाराष्ट्र आणि गोवाच्या सीमावर्ती भागांमध्ये २७ मेपासून पुढील ६ ते ७ दिवस तीव्र पावसाचा फटका बसू शकतो. यामध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पूरसदृश्य स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागांना धोका आहे?

२७ ते ३० मे दरम्यान:

कोकण, पश्चिम घाट परिसर, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकची किनारपट्टी आणि तामिळनाडूच्या घाटमाथ्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

३० मे ते २ जून या कालावधीत:

मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, तसेच ४०-५० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.

मुसळधार पावसामागच कारण काय?

हवामान खात्याच्या मते, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो पुढील ४८ तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाच्या स्वरूपात दिसू शकतो.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहाव.
गरज नसल्यास घराबाहेर न पडण योग्य.
पाण्याने भरलेल्या भागांतून चालल्याने लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा धोका संभऊ शकतो.
स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात.

हवामान खात्याने दिलेला रेड अलर्ट अत्यंत गंभीर असून, नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी ठेवण आणि सुरक्षितता नियमांच पालन करण महत्त्वाचं आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना: ३० जूनपूर्वी पूर्ण करा हे काम, अन्यथा मिळणार नाही मोफत रेशनचा लाभ.

Share This Article