Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार तर मान्सून परतीचा अंदाज? जाणून घ्या

2 Min Read
Maharashtra Weather Relief For Farmers Monsoon Update

Maharashtra Weather Relief For Farmers Monsoon Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परिणामी, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला खीळ बसली आणि अनेक भागांमध्ये उन्हाळी पिकांचेही नुकसान झाले. मात्र आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने सूचित केले आहे की येत्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसंबंधीची राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे, २९ मे ते १२ जून या काळात कोकण वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांना खरीप पेरणी, मशागत, खतफवारणी यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये १ व २ जून दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून परतीचा अंदाज कधी?

पुणे येथील भारतीय हवामान खात्याचे माजी प्रमुख के. एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, १२ जूननंतर राज्यात पुन्हा मान्सून परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे २ आठवड्यांचा हा अवधी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपली शेतीपूर्व तयारी, बियाणे नियोजन, खते आणि पाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा. मान्सूनच्या आगमनापूर्वीची ही वेळ खरीप हंगामाच्या कामांसाठी निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा : आता सरकार देत आहे ७५% सबसिडी, वीज विकून करा लाखोंची कमाई.

Share This Article