Married Women Rights Fathers Property : भारतामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक सरकारी योजना राबवत असताना, अजूनही मुलींचा वडिलांच्या संपत्तीवरील हक्क याबाबत समाजात संभ्रम आहे. अनेकजण विचारतात – लग्न झाल्यावर मुलीला वडिलांच्या संपत्तीत हक्क असतो का? आणि असेल, तर किती?
2005 पासून कायद्याने मिळाला हक्क
हिंदू उत्तराधिकार कायद्यात 2005 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, विवाहित मुलीलाही वडिलांच्या संपत्तीवर मुलासारखाच समान हक्क आहे. याआधी, विवाहित मुलींना अशा प्रकारचा अधिकार नव्हता.
मात्र, काही अटी लागू होतात
जर वडिलांनी वसीयत तयार करून संपत्ती कोणालाही दिली असेल, तर त्या वसीयतेनुसारच संपत्ती वाटली जाते. त्या वेळी मुलगी हक्क सांगू शकत नाही.
वडिलांची संपत्ती जर स्वतः कमावलेली (self-acquired) असेल, तर वडिलांना ती कोणालाही देण्याचा संपूर्ण अधिकार असतो.
जर संपत्तीवर कोणताही गुन्हेगारी (criminal) वाद प्रलंबित असेल, तर मुलगा-मुलगी कोणताही हक्क सांगू शकत नाहीत.
विवाहित महिलांना त्यांचे कायदेशीर हक्क जाणून घेण खूप गरजेच आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेचा मोठा खुलासा.