Minor Pan Card: आता 18 वर्षांखालील मुलांसाठीही पॅन कार्ड आवश्यक? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

2 Min Read
Minor Pan Card Application Process Importance

Minor Pan Card Application Process Importance : पॅन कार्ड म्हटल की आपण प्रामुख्याने प्रौढ व्यक्तींचाच विचार करतो. मात्र सध्या आयकर विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या एका विशेष डिजिटल मोहीमेमुळे, 18 वर्षांखालील मुलांनाही पॅन कार्ड असण का गरजेच आहे, हे समोर आल आहे. विशेषतः जेव्हा मुलांच्या नावाने बँक खाते उघडायच असेल, गुंतवणूक करायची असेल किंवा भविष्यासाठी आर्थिक नियोजन करायच असेल, तेव्हा पॅन कार्डची गरज पडते.

बरेच पालक समजतात की पॅन कार्ड केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींनाच मिळू शकत, पण ही एक चुकीची समजूत आहे. पण मुलांच्या नावानेही पॅन कार्ड बनवता येत आणि काही वेळा ते अत्यावश्यकही असत. भारतातच नव्हे, तर परदेशात राहणाऱ्या NRI मुलांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे.

18 वर्षांखालील मुलांच्या पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा?

18 वर्षांखालील मुल पॅन कार्डसाठी स्वतःहून अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावतीने पालक अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

  1. NSDL वेबसाइट वर जा.
  2. “New PAN – Indian Citizen (Form 49A)” निवडा आणि “Individual” ही श्रेणी सिलेक्ट करा.
  3. मुलाची माहिती, पालकांचा पत्ता, मोबाईल नंबर आणि सिग्नेचर भरा.
  4. आवश्यक फोटो आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  5. अर्जाची फी ऑनलाईन भरा.
  6. यशस्वी सबमिशननंतर तुम्हाला एक अ‍ॅकनॉलेजमेंट क्रमांक मिळेल.

जर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निवडल असेल, तर 15 दिवसांच्या आत कागदपत्रे पोस्टाने संबंधित पत्त्यावर पाठवावीत.

कोणते डॉक्युमेंट्स लागतात?

मुलाचा जन्म दाखला
पालकाचे आधार कार्ड/ओळखपत्र
मुलाचा फोटो (ऑनलाईन अर्जासाठी)
पत्ता पुरावा

माइनर पॅन कार्डमध्ये काय वेगळ असत?

18 वर्षांखालील मुलाच्या पॅन कार्डावर त्याचा फोटो किंवा सिग्नेचर नसतो. मात्र, एकदा तो/ती 18 वर्षांचा झाल्यावर नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागतो, ज्यावर फोटो आणि सिग्नेचर असतात. महत्त्वाच म्हणजे पॅन नंबर मात्र तोच राहतो.

18 वर्षांखालील मुलांसाठी पॅन कार्ड का आवश्यक?

मुलांच्या नावाने बँक खाते उघडण्यासाठी
म्युच्युअल फंड, FDs किंवा अन्य गुंतवणुकीसाठी
करदायित्व किंवा आर्थिक व्यवहारांसाठी
NRI मुलांच्या भारतातील आर्थिक व्यवहारांसाठी

हेही वाचा : पीएम किसान योजनेच्या नावाखाली वाढली फसवणूक, शेतकऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज.

Share This Article