Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल सुरू; पुढील 2-3 दिवसांत आगमन!

1 Min Read
Monsoon Maharashtra Update 2025

Monsoon Maharashtra Update 2025 : दक्षिण-पश्चिम मान्सून यंदा नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच देशात दाखल झाला असून, आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये यंदा 25 मे रोजीच मान्सून दाखल झाला, जो 2009 नंतरचा सर्वात लवकर आगमनाचा दिवस ठरला आहे. नेहमी साधारणतः 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा अनुकूल हवामानामुळे ही प्रक्रिया लवकर झाली आहे.

कोकणातील रत्नागिरी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सून पुढे सरकण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी सध्या कोणताही विशेष इशारा दिला गेलेला नसला तरी हवामान विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

🔴 हेही वाचा 👉 पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच; शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी लाभ.

Share This Article