मुंबई | २७ मे २०२५ : New Rules June 2025 – येणाऱ्या १ जून २०२५ पासून देशातील अनेक आर्थिक सेवा व व्यवहारांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार असून एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांपर्यंत सर्वच गोष्टी नवीन नियमांमुळे प्रभावित होणार आहेत.
EPFO मध्ये डिजिटल क्रांती
कर्मचार्यांसाठी एक दिलासादायक बदल म्हणजे EPFO च नवीन वर्जन 3.0 लाँच होण्याची शक्यता आहे. यामुळे पीएफ काढणे, डाटा अपडेट करणे आणि क्लेम प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुलभता येईल. विशेष म्हणजे, या नव्या प्रणालीमुळे ATM कार्डद्वारे थेट पीएफ काढण्याची सुविधा मिळू शकणार आहे.
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन अटी
१ जूनपासून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना काही अटींचे पालन करावे लागणार आहे:
ऑटो-डेबिट फेल झाल्यास 2% दंड
युटिलिटी बिल व फ्युएल ट्रान्झॅक्शनवर अतिरिक्त शुल्क
आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर सप्लिमेंटरी चार्ज
रिवॉर्ड पॉइंट्समध्ये कपात होण्याची शक्यता
ATM ट्रान्झॅक्शन महागणार
नव्या नियमांनुसार ATM ट्रान्झॅक्शनसाठी नव्या शुल्काची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे निशुल्क व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यास ग्राहकांना अधिक पैसे भरावे लागू शकतात.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल
दर महिन्याच्या १ तारखे प्रमाणेच १ जून २०२५ रोजी एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत होणारा बदल थेट सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर प्रभाव करेल.
FD च्या व्याजदरात घट?
बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्यांसाठीही महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या FD वर बँका 6.5% ते 7.5% दरम्यान व्याज देत आहेत, पण १ जूनपासून हे दर कमी होण्याचे संकेत आहेत.
निष्कर्ष:
१ जूनपासून आर्थिक व्यवहारांच्या नियमांमध्ये होणाऱ्या या नव्या बदलांमुळे सामान्य नागरिकांना नियोजन करताना अधिक जागरूक राहावे लागणार आहे. खर्चाचे नियोजन, गुंतवणुकीचे पुनरमूल्यांकन आणि व्यवहार करताना नव्या अटी लक्षात घेणे सर्वसामान्यांसाठी गरजेचे ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान; ४०% ते ५०% पर्यंत अनुदान, येथे करा अर्ज, थेट खात्यात अनुदान.