Onion Price Hike News: कांद्याच्या दरात लवकरच मोठी वाढ होणार? ‘यामुळे’ दरवाढ अटळ असल्याच बाजार विश्लेषकांच मत

2 Min Read
Onion Price Hike Maharashtra 2025

Onion Price Hike Maharashtra 2025 : महाराष्ट्रात मागील काही आठवड्यांतील अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठ संकट उभ राहिल आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच पीक कापणीपूर्वीच नष्ट झाल, तर साठवणुकीच्या सोयीअभावी हजारो टन कांदा शेतातच खराब झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच कोट्यवधी रुपयांच नुकसान झाल असून, कांद्याच्या दरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

कांदा उत्पादक संघटना आक्रमक; सरकारकडे मदतीची मागणी

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. जळगाव, नाशिक, सोलापूर, बीड, पुणे, अकोला, बुलढाणा, धुळे, परभणी, जालना या भागांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रति एकर किमान १ लाख रुपये नुकसान भरपाई आणि साठवणुकीत खराब झालेल्या कांद्यासाठी प्रति क्विंटल २,००० रुपये अनुदान देण्यात याव. तसेच केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी ३ लाख टन कांद्याची थेट खरेदी ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

बाजारातील तणाव वाढणार? दरवाढ होण्याची शक्यता

उत्पादन घटल्यामुळे आणि पुरवठा कमी झाल्यामुळे पुढील आठवड्यांत कांद्याचे दर वाढू शकतात, असा अंदाज आहे. मागणी कायम असल्याने दरवाढ अटळ असल्याच बाजार विश्लेषकांचे मत आहे. अद्याप केंद्र किंवा राज्य सरकारकडून यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे रखडला; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा.

Share This Article