PAN 2.0 Upgrade Process : पॅन कार्ड हे ओळख व आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाच कागदपत्र आहे. आता पॅन 2.0 हे नवीन स्वरूप सादर करण्यात आल असून, ते आधीच्या कार्डपेक्षा अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. आयकर विभागाने हे नवे पॅन कार्ड QR कोडसह सादर केले असून यामुळे प्रमाणीकरण जलद होते आणि फसवणुकीची शक्यता कमी होते.
तुम्हाला तुमचे जुने पॅन कार्ड पॅन 2.0 मध्ये अपग्रेड करायचे असेल, तर ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
ई-पॅन आणि फिजिकल पॅन मध्ये काय फरक आहे?
ई-पॅन: हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असून ईमेलवर मोफत मिळते.
फिजिकल पॅन: पोस्टाद्वारे घरी पाठवले जाते. यासाठी ₹50 नाममात्र शुल्क भरावे लागते.
पॅन 2.0 कोण देते?
देशात दोन अधिकृत संस्था पॅन सेवा देतात:
- प्रोटिअन EGOV टेक्नॉलॉजीज लिमिटेड (NSDL)
- UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड (UTIITSL)
तुमचे पॅन कोणत्या संस्थेमार्फत जारी झाले आहे हे तपासण्यासाठी तुमचे पॅन कार्ड बघा. त्यानुसार पुढील प्रक्रिया करा.
प्रोटिअन (NSDL) मार्फत पॅन 2.0 कसे अपग्रेड कराल?
- प्रोटिअनच्या पॅन रि-प्रिंट वेबसाईटवर जा.
- पॅन नंबर, आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
- घोषणेला सहमती द्या आणि “Submit” वर क्लिक करा.
- तुमचा तपशील पडताळा आणि OTP साठी मोबाइल किंवा ईमेल निवडा.
- मिळालेला OTP टाका आणि सबमिट करा.
- पेमेंट पेजवर जाऊन ₹50 शुल्क भरा.
- पेमेंट केल्यानंतर पावती मिळेल, ती सेव्ह करा.
- 24 तासांनंतर ई-पॅन डाउनलोड करा.
- फिजिकल पॅन 15-20 दिवसांत तुमच्या पत्त्यावर येईल.
लक्षात ठेवा:
जुन पॅन कार्ड वैध आहे, अपग्रेड करणे ऐच्छिक आहे.
QR कोडमुळे नवीन पॅन अधिक सुरक्षित व सोयीस्कर आहे.
सूचना: या सेवेचा लाभ फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच घ्या. कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाइटवर वैयक्तिक माहिती देणे टाळा.
🔴 हेही वाचा 👉 या योजनेत मोठा बदल! अनुदानात २५% वाढ; आता मिळणार २५,००० रुपये.