Pan Card Active Or Not Check Online : PAN कार्ड (Permanent Account Number) हा केवळ करदायित्वासाठीच ओळखपत्र नसून, बँकिंग, गुंतवणूक, मालमत्ता खरेदी यांसारख्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये त्याचा वापर आवश्यक असतो. मात्र, अनेकांना हे माहितच नसते की त्यांचे PAN कार्ड अॅक्टिव्ह (सक्रिय) आहे की नाही. जर तुमचे PAN कार्ड इनऍक्टिव्ह (असक्रिय) झाले असेल, तर तुमचे आर्थिक व्यवहार अडचणीत येऊ शकतात.
सरकारकडून आधार लिंक नसलेली किंवा चुकीची माहिती असलेली PAN कार्डे अॅक्टिव्ह राहणार नाहीत, असा स्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक करदात्याने किंवा आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी आपले PAN कार्ड अॅक्टिव्ह आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
PAN कार्ड स्टेटस ऑनलाइन कस तपासायच?
PAN कार्ड अॅक्टिव्ह आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- इन्कम टॅक्स ई-फायलींग पोर्टल (https://www.incometax.gov.in) ला भेट द्या.
- होमपेजवर ‘Quick Links’ विभागात ‘Verify Your PAN’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा PAN नंबर, नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर भरा आणि ‘Continue’ वर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि ‘Validate’ बटण क्लिक करा.
- स्क्रीनवर तुमच्या PAN कार्डचा स्टेटस दाखवला जाईल – तुमच PAN कार्ड अॅक्टिव्ह आहे की नाही.
PAN कार्ड अपडेट का आवश्यक आहे?
जर तुमच PAN कार्ड इनअॅक्टिव्ह असेल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे, बँकिंग व्यवहार, मोठी गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी यांसारख्या गोष्टींमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे दर 6 महिन्यांनी PAN स्टेटस तपासण गरजेच आहे.
🔴 हेही वाचा 👉 महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि पहिला गॅस सिलेंडर मोफत; जाणून घ्या संपूर्ण माहिती.