Pan Card Penalty 10000 Inactive Link Aadhar Check Status : PAN कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने जारी केलेल्या नव्या सूचना लक्षात घेतल्या नाहीत, तर तुमच्यावर ₹10,000 पर्यंतचा दंड भरण्याची वेळ येऊ शकते. निष्क्रिय (inactive) PAN कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींना हा आर्थिक फटका बसू शकतो.
कोणत्या प्रकरणांमध्ये लागतो दंड?
PAN आणि आधार लिंक नसल्यास कार्ड निष्क्रिय होऊ शकते.
एकाहून अधिक PAN कार्ड असल्यास किंवा डुप्लिकेट PAN घेतल्यास ते रद्द ठरू शकते.
जर एखाद्या व्यक्तीकडे दोन PAN कार्ड असतील आणि त्यांनी ती माहिती सरकारला दिली नसेल, तर त्यांना ₹10,000 पर्यंतचा दंड होऊ शकतो.
PAN कार्ड Active आहे की नाही, हे घरबसल्या तपासा
- आयकर विभागाच्या e-Filing पोर्टल वर जा.
- “Quick Links” मध्ये “Verify Your PAN” वर क्लिक करा.
- आपला PAN नंबर, पूर्ण नाव, जन्मतारीख व मोबाइल नंबर टाका.
- मोबाइलवर आलेला OTP भरल्यानंतर, “PAN is Active” किंवा “PAN is Deactivated” अस स्टेटस दिसेल.
निष्क्रिय PAN पुन्हा कस Activate करायच?
तुमच PAN जर आधारशी लिंक नसेल, तर तत्काळ लिंक करा.
डुप्लिकेट PAN असल्यास, त्यातील एक कार्ड सरेंडर करा.
आवश्यकता असल्यास NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवरून रिक्वेस्ट सुद्धा टाकता येते.
सरकारचा उद्देश टॅक्स चोरी रोखणे आणि आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणणे आहे. बनावट किंवा एकाहून अधिक PAN कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींमुळे आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा : PPF मध्ये दरवर्षी 1 लाख गुंतवले तर 15 वर्षांनी किती रुपये मिळतील? जाणून घ्या संपूर्ण हिशोब.