PM Kisan Yojana 20th Installment June 2025 Beneficiaries Check : देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दिलासा देणारी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN YOJANA) अंतर्गत २०वा हप्ता जून २०२५ मध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, मीडिया अहवालांनुसार जून महिन्यात पैसे खात्यात जमा होऊ शकतात. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
आतापर्यंत १९ हप्ते वितरित, शेतकऱ्यांना २०व्या हप्त्याची प्रतीक्षा
२०१९ साली पीएम किसान योजना सुरु करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० इतकी रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये (₹२,००० × ३) दिली जाते. आतापर्यंत १९ हप्ते वितरित करण्यात आले असून, शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये खात्यात जमा झाला होता. त्यानंतर चार महिन्यांचा कालावधी लोटल्यामुळे, जून २०२५ मध्ये २०वा हफ्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार २०वा हप्ता?
ई-केवायसी पूर्ण केलेले शेतकरी
भू-सत्यापन (land verification) प्रक्रिया पूर्ण केलेले शेतकरी
बँक खाते आधार कार्डशी लिंक केले असल्यास
वरील तिन्ही कामे पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 20वा हप्ता जमा केला जाणार आहे.
कोण ठरू शकतात अपात्र?
ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेले नाही
ज्यांचे भूलेख सत्यापन बाकी आहे
ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही
ज्यांनी अर्ज करताना चुकीची माहिती दिली आहे
या सर्व प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे पात्रतेचे सर्व निकष त्वरीत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
PM Kisan योजना शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे?
PM-KISAN योजनेचा उद्देश लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊन त्यांच्या कृषी खर्चास हातभार लावणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मोठा हातभार लागतो आहे.
हेही वाचा : PAN कार्डधारकांनो सावधान! होऊ शकतो 10,000 रुपये दंड.