PM Poshan Yojana Maharashtra New GR : महाराष्ट्र सरकारने ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ (PM POSHAN) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठीचा खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 1 मे 2025 पासून लागू करण्यात आले असून, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी दररोज ₹6.78 तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ₹10.17 इतका खर्च मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्याचा निर्णय
ही वाढ 21 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारच्या आदेशानंतर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या नवीन शासकीय निर्णयानुसार (GR), राज्यातील सर्व शाळांमध्ये हे दर लागू करण्यात आले आहेत. मार्च 2025 मध्ये दर वाढवण्यात आले होते — त्यावेळी प्राथमिकसाठी ₹6.19 आणि उच्च प्राथमिकसाठी ₹9.29 खर्च मंजूर झाला होता. या आधी हे दर अनुक्रमे ₹5.45 आणि ₹8.17 होते.
पोषण आणि अन्नधान्याचा नवा आराखडा
PM POSHAN योजनेनुसार, प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना दररोज 450 कॅलरी आणि 12 ग्रॅम प्रथिने तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना 700 कॅलरी आणि 20 ग्रॅम प्रथिनांचे भोजन दिले जाते. यासाठी केंद्र सरकार दररोज प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 100 ग्रॅम व उच्च प्राथमिकसाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवते.
ग्रामीण व शहरी भागात खर्चाचे वाटप
ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर साहित्य खरेदी केल जात असल्याने खर्चाचे विश्लेषण करण्यात आल आहे.
प्राथमिक वर्गासाठी ₹6.78 पैकी ₹4.19 अन्नधान्य व मुख्य साहित्यासाठी, ₹2.59 इंधन व भाज्यांसाठी खर्च
उच्च प्राथमिक वर्गासाठी ₹6.29 मुख्य साहित्यासाठी, ₹3.88 इंधन व भाज्यांसाठी खर्च
शहरी भागात केंद्रीकृत स्वयंपाकगृहांमधून अन्न पुरवले जाते आणि याच दरांनी खर्च केला जाईल.
वित्त व नियोजन विभागाची मान्यता
राज्य शासनाने स्पष्ट केल आहे की, या दरवाढीस नियोजन विभाग व वित्त विभागाची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता शाळांना पोषण योजनेच्या खर्चात अडथळा येणार नाही.
हेही वाचा : आता 70 वर्षांपर्यंत करता येणार सरकारी नोकरी, निर्णयावर कर्मचारी संघटनांनी घेतला जोरदार आक्षेप.