PM Shram Yogi Mandhan Yojana : केंद्र सरकारकडून असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी एक महत्त्वाची योजना राबवली जात आहे. ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ या योजनेअंतर्गत श्रमिकांना 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगार, रिक्षाचालक, घरकाम करणारे, मजुरीवर काम करणारे यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
सरकारने ही योजना (Pension Scheme) श्रमिकांच्या वृद्धावस्थेतील आर्थिक सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही कामगार या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. अर्ज करताना व्यक्तीच्या वयाच्या आधारे त्याचा दरमहा हप्ता ठरवला जातो. उदा. 18 वर्षांच्या व्यक्तीला फक्त 55 रुपये तर 40 वर्षांच्या व्यक्तीला दरमहा 200 रुपये भरावे लागतात. हे योगदान 60 वर्षांचे होईपर्यंत करावे लागते.
या पेन्शन योजनेत सहभागी झाल्यानंतर आणि 60 वर्षे पूर्ण झाल्यावर केंद्र सरकार दरमहा 3000 रुपयांची पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करते.
PM Shram Yogi Mandhan Yojana अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
ओळखपत्र
पासपोर्ट साइज फोटो
मोबाईल क्रमांक
पत्र व्यवहाराचा पत्ता
उत्पन्नाचा पुरावा
जर वरीलपैकी कोणतेही कागदपत्र अपूर्ण असतील, तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
सरकारच्या या योजनेमुळे गरीब आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धावस्थेत मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 फक्त २०० रुपयांत शेतजमिनीची हिस्सेवाटप मोजणी; महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय.